Monday, October 25, 2010

स्वयंपाक घरातील स्वच्छता ...........

               सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वयंपाक घरात व्यवस्थित  प्रकाश हा आलाच पाहिजे.पाण्याची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे.व्यर्थ पदार्थ,धूर,खराब पाणी, खरकटे इ. मुळे जास्त खराबी होते.स्वयंपाक घरात माश्या,मच्छर, उंदीर, झुरळे यांचा उपद्रव असू नये,कारण ते ख्याद्या पदार्थ दुषित करतात.स्वयंपाक घरातील खिडक्या व दरवाजे यावर जाळीचे दरवाजे लावावे म्हणजे माश्या व मच्छर याचं उपद्रव रोखाल जाईल. भाजी ची  साल टाकण्यासाठी झाकणाची बादली ठेवावी. या बादलीला आठवड्यातून एकदा खाली करून त्यात कागद जाळून घ्यावा म्हणजे त्यात किटाणू राहण्याची भीती राहत नाही. कपाटात असलेल्या  पदार्थांची रोज पाहणी करावी कि ते खराब तर होत नाहीत ना.कपाटात पेपर पसरून त्यात सामान ठेवावे. फ्रीज मध्ये आवश्यक ते सामान ठेवावे. उदा. भाजी वगेरे जास्त वेळ ठेवू नये. आठवड्यातून एकदा फ्रीज मधील सर्व सामान काढून फ्रीज  व्यवस्थित  साफ करावा म्हणजे त्यातून वास येणार नाही. २-४ महिन्यातून एकदा स्वयंपाक घरातील सर्व सामान बाहेर काढून स्वयंपाक घर पूर्णपणे साफ करून पेपर वगेरे बदलून सामान व्यवस्थित आणि कोणतीही खाण्या पिण्याची वस्तू उघडी न ठेवल्यामुळे आजाराची भीती राहणार नाही. कुटुंबाच्या स्वथ्यासाठी व सुरक्षितेसाठी स्वयंपाक घरातील स्वच्छता आवश्यक आहे.
            स्वयंपाक घर हा प्रत्येक घराचा आरसा असतो,तसेच तो व्यक्तिमत्वाचा पण आरसा असतो.स्वयंपाक घर
व्यवस्थित  व नीट नेटके आणि स्वच्छ असेल तर येणाऱ्या पाहुण्यांचा घराकडे आणि घरातल्या माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नेहमी चांगला असेल आणि त्यांची नेहमी प्रशौषा ऐकाल.

स्वयंपाक घराबाबत

खालील काही सूचना आपण स्वयंपाक घरातील वातावरण आनंददायी बनविन्यासाठी अंमलात आणू सकता.........
स्वयंपाक घरातील व्यवस्था नीट नेटकी असावी.
आपल्या स्वयंपाक घरातील स्वच्छतेवर स्वास्थ्य अवलंबून असते.
सध्याच्या युगात स्वयंपाक घरात उभे राहून जेवण बनविण्याची सोय असते.त्या मुळे कपडे हि खराब होत नाहीत,तसेच लहान मुळे गस जवळ येण्याची भीती राहत नाही. भांडी व इतर खाद्य पदार्थ ठेवण्यासाठी मांडणी बनवावी. जेवण बनविते वेळी धूर बाहेर जाण्यासाठी exaust  पंख्याची सोय असावी.फ्रीज शक्यतो स्वयंपाक घरात ठेवावा,त्यामुळे वेळेची बचत होते. स्वयंपाक घरात सर्वात महत्वाची बाब म्हणजे बेसिन ची सुविधा उत्तम असणे गरजेचे आहे.कारण पाण्याशिवाय स्वयंपाकाची कल्पना कोणतीही गृहिणी करू शकत नाही.स्वयंपाक करताना शक्यतो अप्रोन वापरावा.नळा जवळ स्वच्छ व चांगला रुमाल ठेवावा,ज्या मुळे साडी किवा ड्रेस ला हात पुसण्याची वेळ येणार नाही. चाकू,सुरी,चमचे या सारक्या वस्तू निश्चित जागेत ठेवाव्या,ज्या मुळे त्या आपल्याला लवकर सापडतील.दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपल्या डोळ्या समोर असाव्या.भांडी जवळच खाली बनविलेल्या रक मध्ये व वरती भिंतीवर ठोकलेल्या बंद मांडणीत ठेवावे..