Monday, October 25, 2010

स्वयंपाक घराबाबत

खालील काही सूचना आपण स्वयंपाक घरातील वातावरण आनंददायी बनविन्यासाठी अंमलात आणू सकता.........
स्वयंपाक घरातील व्यवस्था नीट नेटकी असावी.
आपल्या स्वयंपाक घरातील स्वच्छतेवर स्वास्थ्य अवलंबून असते.
सध्याच्या युगात स्वयंपाक घरात उभे राहून जेवण बनविण्याची सोय असते.त्या मुळे कपडे हि खराब होत नाहीत,तसेच लहान मुळे गस जवळ येण्याची भीती राहत नाही. भांडी व इतर खाद्य पदार्थ ठेवण्यासाठी मांडणी बनवावी. जेवण बनविते वेळी धूर बाहेर जाण्यासाठी exaust  पंख्याची सोय असावी.फ्रीज शक्यतो स्वयंपाक घरात ठेवावा,त्यामुळे वेळेची बचत होते. स्वयंपाक घरात सर्वात महत्वाची बाब म्हणजे बेसिन ची सुविधा उत्तम असणे गरजेचे आहे.कारण पाण्याशिवाय स्वयंपाकाची कल्पना कोणतीही गृहिणी करू शकत नाही.स्वयंपाक करताना शक्यतो अप्रोन वापरावा.नळा जवळ स्वच्छ व चांगला रुमाल ठेवावा,ज्या मुळे साडी किवा ड्रेस ला हात पुसण्याची वेळ येणार नाही. चाकू,सुरी,चमचे या सारक्या वस्तू निश्चित जागेत ठेवाव्या,ज्या मुळे त्या आपल्याला लवकर सापडतील.दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपल्या डोळ्या समोर असाव्या.भांडी जवळच खाली बनविलेल्या रक मध्ये व वरती भिंतीवर ठोकलेल्या बंद मांडणीत ठेवावे..

No comments:

Post a Comment