सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वयंपाक घरात व्यवस्थित प्रकाश हा आलाच पाहिजे.पाण्याची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे.व्यर्थ पदार्थ,धूर,खराब पाणी, खरकटे इ. मुळे जास्त खराबी होते.स्वयंपाक घरात माश्या,मच्छर, उंदीर, झुरळे यांचा उपद्रव असू नये,कारण ते ख्याद्या पदार्थ दुषित करतात.स्वयंपाक घरातील खिडक्या व दरवाजे यावर जाळीचे दरवाजे लावावे म्हणजे माश्या व मच्छर याचं उपद्रव रोखाल जाईल. भाजी ची साल टाकण्यासाठी झाकणाची बादली ठेवावी. या बादलीला आठवड्यातून एकदा खाली करून त्यात कागद जाळून घ्यावा म्हणजे त्यात किटाणू राहण्याची भीती राहत नाही. कपाटात असलेल्या पदार्थांची रोज पाहणी करावी कि ते खराब तर होत नाहीत ना.कपाटात पेपर पसरून त्यात सामान ठेवावे. फ्रीज मध्ये आवश्यक ते सामान ठेवावे. उदा. भाजी वगेरे जास्त वेळ ठेवू नये. आठवड्यातून एकदा फ्रीज मधील सर्व सामान काढून फ्रीज व्यवस्थित साफ करावा म्हणजे त्यातून वास येणार नाही. २-४ महिन्यातून एकदा स्वयंपाक घरातील सर्व सामान बाहेर काढून स्वयंपाक घर पूर्णपणे साफ करून पेपर वगेरे बदलून सामान व्यवस्थित आणि कोणतीही खाण्या पिण्याची वस्तू उघडी न ठेवल्यामुळे आजाराची भीती राहणार नाही. कुटुंबाच्या स्वथ्यासाठी व सुरक्षितेसाठी स्वयंपाक घरातील स्वच्छता आवश्यक आहे.
स्वयंपाक घर हा प्रत्येक घराचा आरसा असतो,तसेच तो व्यक्तिमत्वाचा पण आरसा असतो.स्वयंपाक घर व्यवस्थित व नीट नेटके आणि स्वच्छ असेल तर येणाऱ्या पाहुण्यांचा घराकडे आणि घरातल्या माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नेहमी चांगला असेल आणि त्यांची नेहमी प्रशौषा ऐकाल.

No comments:
Post a Comment